सांबरा येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
एसडीएमसी अध्यक्ष आणि शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले. शिक्षक व्ही. एस. कंग्राळकर यांनी स्वागत केले. एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी, शाळेच्या मुख्याध्यापिका ए ए पाटील, टी व्ही पाटील, आर बी लोहार, के बी सुंठणकर आणि आर आर मगदुम उपस्थित होते. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थीची भाषणे झाली.
या शाळेत झाली सावित्रीबाई फुले जयंती साजरी
