नवी दिल्ली, 6: महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन आज साजरा करण्यात आला.
बाबा खडकसिंग मार्गस्थित कार्यालयात, उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमुल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिनाच्या निमित्ताने राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
वि.वृ.क्र.3 /दि.6.01.2024