10 गुन्ह्यात 15 लाखांची चोरी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील व नेसरगी येथील घरफोडीच्या प्रकरणी चोरीला गेलेला माल उघडकीस पोलिसानी शोधुन काढला असल्याची माहिती
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर एस. गुळेद यांनी दिली आहे .
याप्रकरणी दोन आरोपींना महाराष्ट्र राज्यात अटक करण्यात आली आहे. 1] दीपक सुदेश पवार वय 22 आणि राहुल गंगाधर जाधव वय 21 रहाणार जालना महाराष्ट्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत
या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल , नेसरगी, हुक्केरी आणि संकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत . या प्रकरणात त्यांच्याकडून 15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत .या आरोपींवर न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एक सहआरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.