मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बेळगाव येथून पाठिंबा देण्यात येतोय. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा कडून त्यांना हा पाठिंबा देण्यात येतोय. 20 जानेवारी रोजी बेळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून त्यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. याच दिवशी जरांगे पाटील हे जालनावरून मुंबई येथे रवाना होणार आहेत.याच पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्याकरिता बेळगाव मध्ये एकदिवशीय लाक्षणिक उपोषण उपोषण होणार आहे. बेळगावातील मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावे याकरिता त्यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. मात्र कर्नाटक सरकार या उपोषणाला परवानगी देणार की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून हे उपोषण करणार आहेत.