सीमा भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत उपलब्ध होऊ लागलीए. मदत मिळत असली तरीही यासाठी अर्ज कुठे व कसा करावा याबाबत नागरिकांना माहिती नसल्याने टोल फ्री क्रमांक तसेच बेळगाव मध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने नागरिकांच्या सोयीसाठी बेळगाव शहरात पाच ठिकाणी सेवा केंद्र सुरू केली आहेत. विठ्ठल देव गल्ली शहापूर , सिद्धिविनायक सेवा केंद्र डाग बंगला गोवावेस, महाराष्ट्र एकीकरण सेवा समिती केंद्र खडक गल्ली , शिवाजीनगर तसेच रंगुबाई भोसले पॅलेस सेवा केंद्र या ठिकाणी नागरीकांना आता संपर्क साधता येणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सीमावासियांकरिता टोल फ्री क्रमांक सुद्धा जाहीर केला आहे.8650567567 या क्रमांकाशी संपर्क साधून अर्ज कसा करावा तसेच इतर कागदपत्रांची माहिती जाणून घेता येणार आहेत.
महाराष्ट्राच्या वैद्यकीय मदतीसाठी बेळगावात सेवा केंद्राचे क्रमांक जाहीर
By Akshata Naik
Previous article20 जानेवारीला करणार लाक्षणिक उपोषण