महापालिका आयुक्तांनी बेळगाव मध्ये कन्नड सक्ती चा फतवा काढला. बेळगाव मध्ये प्रत्येक व्यापाराच्या दुकानांवर कन्नड पाटी दिसली पाहिजे तसेच बेळगावी असा ठळकपणे उल्लेख दिसला पाहिजे असे परिपत्रक आयुक्तांनी जारी केले होते. जर असे न आढळल्यास व्यापारा परवाना रद्द करून टाळे ठोकण्यात येईल असा आदेश दिला होता. या सगळ्यात मराठी माणसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं.
त्याच विरोधात आज विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमा प्रश्न हा न्यायालयात असताना तुम्ही सीमा भागात कन्नड सक्ती कशी करू शकता असा प्रश्न विचारला .
सीमा भागातील 865 गावांमध्ये कोणत्याही ठिकाणी कर्नाटक सरकार अशा प्रकारचा आदेश लागू करू शकत नाही. तुम्ही विनंती करा मात्र दादागिरी करून आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत असा इशारा ठणकावून सांगत देण्यात आलाय.
बेळगावचा प्रश्न हा अजूनही जिवंत आहे.केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सीमा प्रश्न हा मान्य केला आहे असे असताना कर्नाटक सरकार अशा प्रकारे दमदाटी करू शकत नाही. जर सीमा भागात कन्नड संघटनांनी कोणत्याही प्रकारची दादागिरी केली आणि मराठी फलक काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि कर्नाटक सरकारने जो आदेश लागू केला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी केली.