No menu items!
Monday, December 23, 2024

गडमोहिम फत्ते

Must read

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा ३९वा रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहीमेचा सांगता सोहळा आज महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावात संपन्न झाला. यावेळी उपस्थित धारकऱ्यांशी संवाद साधून माझे मनोगत मांडले.

आज या सांगता सोहळ्यासाठी नजर जाईल तिथे हजारो तरुण एकत्र आले असून इथे जणू भगवं वादळ आल्याचा भास होत असल्याचे मत व्यक्त केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजी भिडे गुरुजींनी घडवलेला तरुण इथे नजर जाईल तिथे पहायला मिळतोय. त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांना लाजवेल असे असून त्यांच्या प्रेरणेतून आजही लाखो तरुण घडत आहेत असे आवर्जून नमूद केले.

या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या मातीत झाला त्या मातीत आपण हा कार्यक्रम करतोय याला वेगळे महत्व आहे. तरुणांना गडकोट किल्यांचे महत्त्व कळावे यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते. रायरेश्वर ते प्रतापगड मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला मानाचा मुजरा असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचे होत असलेले उदात्तीकरण आम्ही थांबवले. मलंगगड देखील लवकरच मुक्त केला जाईल. बाकी गडकोट किल्ल्यावरील अतिक्रमण देखील महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याने दूर केले जाईल असे स्पष्ट केले.

प्रतापगड जतन संवर्धनासाठी १०० कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. गडकोट किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि असंख्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!