छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व लोकसेवा फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने बेळगाव शहरातील विविध नवदुर्गा माता मंदिरातील भाविक भक्तांनी आहेर म्हणून दिलेल्या साड्यांचा वापर वृद्धाश्रमातील महिलांना ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना साड्यांचा उपयोग करून देण्यासाठी सर्व लोकसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री वीरेश बसय्या हिरेमठ यांच्या पुढाकाराने चींनामा बसवंतया हिरेमठ, देवराज कॉलनी वृद्धाश्रम , कुडची या ठिकाणी या साड्यांचे वितरण वृद्ध महिलांना करण्यात आले की जेणेकरून या मातांना त्यांचा उपयोग होऊन खऱ्या देवींना आहेर दिल्याचे सार्थक होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली तसेच या साड्या मिळाल्यानंतर त्या वृद्ध महिलांना देखील देवीचा आशीर्वाद मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होते. सोबत सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ,सदस्य तसेच श्री. एम.एस.चौगला वृद्धाश्रम इनचार्ज व वृद्धाश्रमातील सर्व स्टाफ उपस्थित होते.