No menu items!
Wednesday, February 5, 2025

बेळगावी डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस सेंटर असोसिएशनच्या जनरल सेक्रिटीपदी सुनील जाधव यांची बिनविरोध निवड…

Must read

बेळगाव : बेळगावी डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस सेंटर असोसिएशनच्या जनरल सेक्रिटीपदी सुनील विजयानंद जाधव यांना जनरल सेक्रिटी होण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची माहित असोसिएशचे अध्यक्ष राम बदरगडे यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यातील तिन हजार हुन अधिक बेळगावी डिजिटल ऑन लाईन सेंटर असणाऱ्या संघटनेवर संचालक प्रतिनिधित्व करीत आहे. सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिनविरोध सुनील जाधव यांची निवड करण्यात आली. बेळगाव क्लब रोड येथील 25 फ्रेबवरी रोजी सकाळी 1 वाजता इफा हॉटेल येथे निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी बैठकीत नवनिर्वाचित जनरल सेक्रिटी सुनील जाधव म्हणाले असोसिएशनच्या माध्यमातून कॉमन सर्विस सेंटरातील मालक व शासनाच्या विविध समस्यांबाबत लवकरच विचारमंथन करण्यासाठी बैठक घेण्यात येईल असे सांगितले. तसेच अन्य माध्यमातून मिळणारे पोर्टल सि.एस.सीला मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवेदन देण्यात येईल. तसेच विविध पोर्टल व ऑनलाईन वर आवेदन पत्र भरणे यासारख्या विविध वेब पोर्टल वर काम करताना येत असलेल्या समस्या शासकीय पातळीवर पाठपुरावा करून सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी यावेळी असोसिएशनच्या सदस्यांना सांगितले.

तसेच ही संघटना राज्यपातळीवर शासकीय योजना राबविल्या जातात त्या सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी संघटना म्हणून बेळगावी डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस सेंटर असोसिएशन जिल्ह्या पातळीवर संघटनात्मक कार्य करीत आहे.

कॉमन सर्विस सेंटर कामाबाबतच्या समस्यांची सोडवणूक करणेसाठी संघटना सदैव प्रयत्नशील असून सि.एस.सी च्या सदस्यांनी संघटित होणे गरजेचे आहे असे आवाहन असोसिएशनचे कामना चौगुले यांनी केले.

यावेळी असोसिएशनचे वतीने हमीद इनामदार, संजय मैशाळे,मोशीन ताशीलदार,उदय बरबरी, समिउला मुल्ला, कामना चौगुले,मृत्यूनंजय मंत्रांनावर,राम बदरगडे तसेच निपाणी, बेनाडी,चिकोडी, गोकाक,खानापूर, बैलहोंगल,यासह अन्य भागातील सदस्ययांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृत्यूनंजय मंत्रांनावर व आभारप्रदर्शन संजय मैशाळे यांनी केले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!