No menu items!
Saturday, August 30, 2025

*शिक्षक पिढी घडवतात – *संदीप पाटील*

Must read

कमलेश कर्णिक यांना चंदगड प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

“शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसवण्याचं काम करते. शिक्षण माणसाच्या आयुष्यात उजेड बनून येतं आणि माणसाचं जीवन उजळवून टाकतं. म्हणून महत्त्वाचे असतात शिक्षक… जे आपल्यासाठी ज्ञानदानाचे काम करतात आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी वर्तमान सुधारतात. शिक्षकाची जबाबदारी फार मोठी असते. किंबहुना देशाचं भविष्य शिक्षकांच्या हातात असतं. त्यामुळे देशाला घडवणारे शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतात. ” असे प्रतिपादन चंदगड तालुका ग्राहक पंचायत चे अध्यक्ष संदिप पाटील यांनी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मोहन पाटील होते .

“शिक्षक विद्यार्थी घडवताना आपली समाजिक बांधिलकी जपणारे ,शिक्षण क्षेत्राविषयी अंतरीची तळमळ असणारे एक प्रामाणिक शिक्षक म्हणजे कमलेश कर्णिक सर ” असे मत मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी मांडले .यावेळी महादेव शिवणगेकर , बी एन . पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .

कमलेश कर्णिक सर सध्या नामदेवराव दुंडगेकर विद्यालय मलतवाडी येथे मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करत आहेत .
शालेय पातळीवर आतपर्यंत विविध उपक्रम राबवलेले आहेत. यामध्ये
भाषण स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,
काव्यवाचन व काव्यगायन स्पर्धा ,देशभक्तीपर गीत , गायन स्पर्धा ,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे ,रांगोळी स्पर्धा , प्रत्येक शनिवारी पुरक वाचन ,वाचन प्रेरणा दिन साजरा करणे ,प्रत्येक शनिवारी प्रकट वाचत व सुलेखन सराव ,
राज्यस्तरीय मराठी भाषा विषयक शिबीरात गेली 8 वर्षे सतत सहभाग ,लेखक / कवी आपल्या भेटीला या उपक्रमातून शाळेला अनेक कवी लेखकांची प्रत्यक्ष भेट घडवून विद्यार्थ्यांना अनुभव दिला . त्याच्या या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिना निमित्त चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा पुरस्कार दिला गेला .
कार्यक्रमाला व्ही एस सुतार एच आर पाऊसकर , व्ही . टी . पवार उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे तर आभार राजेंद्र शिवणगेकर यांनी मानले .

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!