जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नॅशनल कौन्सिव् फॉर इनस्पिरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेकडून बेळगावच्या मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य डॉ. सुचेता कुलकर्णी यांना ‘हिरकणी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. सुचेता कुलकर्णी मूळच्या मुंबईच्या असून शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयामध्ये झाले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील पार्ले कॉलेज व उच्च महाविद्यालयीन शिक्षण सर नाथीबाई ठाकरसी महाविद्यालयात झाले आहे. जर्नालिझमचे शिक्षण त्यांनी गरवारे मधून पूर्ण केले.आतापर्यंत त्यांना कॉन्ट्रीब्युशन टू अॅवॉर्ड एज्युकेशन हा पुरस्कार तर २०२१-२०२२ नेल्सन मंडेला ग्लोबल ब्रिलियन्स हा निती आयोगाकडून पुरस्कार, रोटरी क्लब, वेलोझा इव्ह यांच्यातर्फे शैक्षणिक पुरस्कार मिळाला आहे.