No menu items!
Monday, December 23, 2024

आळंदी (पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकरी कीर्तनकार कार्यशाळा उत्साहात पार पडली

Must read

कीर्तनकारांनी सांप्रदायिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

*आळंदी (जिल्हा पुणे)* - कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे, *असे मत ‘महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळा’चे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांनी व्यक्त केले.* ‘डांगे पंच मंडळ कार्यालय’, आळंदी (पुणे) येथे नुकतेच कीर्तनकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

  त्या वेळी ते बोलत होते. १०० हून अधिक जणांची या कार्यशाळेला उपस्थिती लाभली. ह.भ.प. नरहरी महाराज पुढे म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. वारकरी संप्रदाय आणि समितीने राज्यात एकत्रितपणे अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. आज या कार्यशाळेतून जे ज्ञान मिळेल, ते आपण आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सर्व समाजात पोचवले पाहिजे. अशा प्रकारे कार्यशाळांचे आयोजन ठिकठिकाणी केले पाहिजे.

या कार्यशाळेचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. या वेळी गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कर्‍हाडकर, ह.भ.प. आत्माराम महाराज, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे, ह.भ.प. पद्माकर पाटोळे महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, ह.भ.प. राम सूर्यवंशी महाराज, ह.भ.प. रघुनाथ बापू चौधरी महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, ‘जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे’चे ह.भ.प. आत्माराम महाराज शास्त्री, निरंजन शास्त्री कोठेकर महाराज, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदींविषयी विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. 

या वेळी ‘जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे’चे ह.भ.प. आत्माराम महाराज म्हणाले की, मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे. धर्म हे जीवन आहे. ज्याप्रमाणे भूमी वृक्षाला आधार देते. त्याप्रमाणे धर्म मनुष्याला आधार देतो. धर्माविना मनुष्य जगू शकणार नाही. धर्म ही आपली आई आहे. त्यामुळे आपल्याला धर्माचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अनेक समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

नियमितपणे होत असलेल्या गोहत्या, मंदिर सरकारीकरणामुळे असुरक्षित असलेली मंदिरे, शहरी नक्षलवाद, रोहिंग्यांची घुसखोरी, काश्मिरी हिंदूंच्या समस्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतर आदी अनेक समस्या सोडवण्यासाठी संवैधानिक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यकता आहे. आपण आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सक्षमपणे एकत्रित कृती केली पाहिजे. धर्मशिक्षण घेतले पाहिजे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीचे पुणे येथील श्री. नागेश जोशी म्हणाले की, ‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’ मधील ‘कलम ४०’ नुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खासगी, सरकारी आणि बिगर सरकारी भूमींवर, मालमत्तांवर स्वत:च्या मालकीचा दावा करू शकतो. यासाठी सर्वांनी याला संघटितपणे विरोध करायला हवा, तर ‘रणरागिणी शाखे’च्या कु. क्रांती पेटकर म्हणाल्या, ‘भारतात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक महिला, मुली याला बळी पडत आहेत. आज मुलींना लव्ह जिहादचे गांभीर्य लक्षात आणून देणे आवश्यक आहे.’ ‘आज भारतात हलाल जिहादच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा हा डाव आहे’, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले. 

ही कार्यशाळा झाल्यावर बर्‍याच जणांनी ‘अशा प्रकारच्या कार्यशाळा आमच्या गावातही आम्ही घेऊ’, असे सांगितले.

आपला नम्र,
श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!