बेळगाव : बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठीमजगाव येथील कामगार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांबरोबर बुधवार दि. २७ रोजी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बांधकाम संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांनी केले. बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुविधा वेळेत दिल्या जात नाहीत. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. बांधकाम कामगारांना तसेच त्यांच्या मुलांच्या
लग्नांसाठी देखील निधी दिला जातो. मात्र तो निधी देताना टाळाटाळ केली जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत देण्यात येत नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांना महाविद्यालय तसेच शाळांची फी भरावी लागत आहे. बांधकाम कामगारांसाठी थेट योजना आहेत. मात्र त्या योजना राबविताना जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे. त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी बुधवारी बैठक असून त्या ठिकाणीच विविध मागण्यांचे निवेदनदेखील देण्यात येणार आहे.