बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि हळय संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ एस. कलमणी याना ‘गोम्मट ’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
कर्नाटक श्रमिक पत्रकार असोसिएशन स्टेट युनिटतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि रु. ५ हजार रु. रोख रक्कम, फलक आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे.गोम्मट हा पुरस्कार श्रवणबेळगोळ मठाचे श्री चारुकीर्थी भट्टारक महास्वामीजी यांनी प्रायोजित केला आहे.
कुंतीनाथ कलमणी हे गेल्या २३ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी बेळगाव जिल्ह्यात विशेष ठसा उमटवला आहे. कुंतीनाथ कलामणी यांना यापूर्वीच जैन शिक्षक मंच आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक संघटनेची राज्यस्तरीय “वृषभश्री” पुरस्कारा प्राप्त झाली आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हास्तरीय “राज्योत्सव पुरस्कार”, दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिष्ठित “वा रा कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार” उत्तर कर्नाटक जैन महासंघाचा, राज्यस्तरीय “सामाजिक सेवा पुरस्कार”, सार्वजनिक वाचनालय बेळगावचा “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार”, इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. आता त्यांना गोम्मट पुरस्कार मिळाला आहे,. पुरस्कारप्राप्त कुंतीनाथ कलमानी यांचे हार्दिक अभिनंदन, त्यांना पुढील काळात आणखी पुरस्कार मिळावेत अशी शुभेच्छा.