श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंतीउत्सव समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम गुरुवार दि. ९ ते रविवार दि. १२ मे पासून प्रारंभ होत आहेत. रविवार दि. १२ रोजी सकाळी ते ११.३० वा. लघु रुद्राभिषेक, महापूजा, पुष्पार्चन, प्रवचन, मंगलारती व महाप्रसाद होईल. दररोज सायंकाळी ५ ते ६.३० वा. भजन, प्रवचन आणि ६.३० ते ७.३० या वेळेत शंकर तत्वज्ञानावर आधारित प्रवचन होणार आहे. दि. १२ मे रोजी सायंकाळी ४ वा. चिदंबर मंदिरात श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्यकृत स्तोत्रपठण स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे प्रा. एस. जी. कुलकर्णी यांनी कळविले आहे
शंकराचार्य जयंती उत्सव उद्यापासून
By Akshata Naik
Previous article4 हजार 524 मतदान केंद्रे मतदानाकरिता सज्ज
Next articleशिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी