बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात छेडछाड विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. कॅम्प येथील शरकत पार्कजवळ एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला असून या प्रकरणी शनिवारी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दे मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास सायकलंवरून जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला आहे. विनयभंग करणाराही अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली असून त्याचे गयाचित्र पोलिसांना देण्यात आले आहे. सायकलवरून लासला जाताना या विद्यार्थिनीचा पाठलाग करीत तिचा विनयभंग करण्यात आला आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक मल्ताफ मुल्ला पुढील तपास करीत आहेत
विद्यार्थिनीचा विनयभंग कॅम्प पोलिसात तक्रार
By Akshata Naik

Previous articleमोफत दंततपासणी आजपासून शिबिर
Next articleचन्नेवाडी शाळा होणार सुरू– गटशिक्षणाधिकारी