No menu items!
Tuesday, July 1, 2025

काहेरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनी स्पर्धांचे आयोजन

Must read

बेळगाव : केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (काहेर) व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जून रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ :- होणार असून त्यासाठी आयुर्वेदिक कॉलेजच्या स्वस्थ वृत्त व योग – विभागाचे तसेच एसीपीआरच्या एनएसएस विभागाचे सहकार्य लाभणार आहे.

यानिमित्त उपरोक्त दोन्ही संस्था व एसीपीआरच्यावतीने मयूर २०२४ ही योग स्पर्धा दि. ८ जून रोजी तर २० जून रोजी रांगोळी स्पर्धा होणार आहे. योग स्पर्धेसाठी ८ ते १२, १३ ते १७, १८ ते २२ व त्यावरील असे गट करण्यात आले आहेत. याशिवाय संगीत योगा, भरतनाट्यम योगासन स्पर्धा दि. २० रोजी होणार आहेत. २१ जूनच्या योग दिनाचा कार्यक्रम जेएमएफसीच्या सभागृहात होणार आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!