बेळगाव वेंगुर्ला मार्गावर आंबोली रस्त्यावर आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात काल (गुरुवार) पहाटेच्या सुमारा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीकडे जावून स्थिरावला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
हा भलामोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. सध्या येथील वाहतुक सुरळीत सुरु आहे. या रस्त्यावरुन जाणारे पर्यटक दगड पाहण्यासाठी गर्दी करत आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे दगड कोसळून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यामुळे रस्ता वाहतूकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहन चालक व वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण आहे.