बेळगाव ;
मे महिन्यात, बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी महांतेश नगरच्या परिसराची पाहणी केली होती . तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि पिण्याच्या समस्यांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते . त्यानुसार आता या भागातील समस्या निवारणासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांचा शुभारंभ राजू सेठ यांचे चिरंजीव अमान सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टीमसोबत खुसरोनगरमध्ये या कामाचा शुभारंभ केला. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.