No menu items!
Thursday, February 6, 2025

शिवप्रतिष्ठान तर्फे शिवराज्यभिषेक सोहळा

Must read

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1946’ या हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी प्रमुख श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून हार घालण्यात आला. त्यानंतर आरती म्हणून देवदर्शन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पालखीत मुर्ती व ग्रंथ स्थानापन्न करून पालखी पूजन करण्यात आले. श्री छत्रे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज चढवून ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर देवदर्शन यात्रेला सुरुवात झाली. या देवदर्शन यात्रेत प्रारंभी ध्वज नंतर नामदेव भजनी मंडळ शहापुर, ज्ञानेश्वरी भजनी मंडळ धामणे-वडगाव, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ सुळगा या वारकरी संप्रदायाच्या वतीने यात्रेत भजन कीर्तन सादर करण्यात आले. श्री शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर असा देवदर्शन यात्रेचा मार्ग होता. यात अनेक धारकरी, शिवभक्त भगवे फेटे नेसून उत्साहाने सहभागी झाले होते. महिला वर्गाचाही विशेष सहभाग होता. शेवटी ही देवदर्शन यात्रा कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिन हिंदू तिथीनुसारच साजरा केला पाहिजे. ज्या प्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावरती झाला. त्यानंतर महाराज देवदर्शनासाठी जगदीश्वराच्या मंदिराला गेले. त्याच धर्तीवर आदरणीय भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिनाच्या पूजेनंतर या देवदर्शन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी व्यक्त केले. शेवटी कपिलेश्वर मंदिर येथे महादेवाची आरती करून ध्येयमंत्र म्हणून दौलत साळुंखे व ध्वज उतरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व शिवभक्तांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, वडगाव अनगोळ विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण,तालुका कार्यवाह कल्लापा पाटील, किरण बडवाणाचे, गजानन निलजकर, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विजय कुंटे, प्रमोद चौगुले,प्रफुल शिरवळकर, सदाभाऊ जांगळे, गणेश जांगळे, मारुती पाटील, गजानन पवार,अंकुश केसरकर,गिरीश पाटील, आनंद कांबळे, चंद्रशेखर चौगुले, अमोल केसरकर,अभिजीत अष्टेकर,राम सुतार,अतुल केसरकर,संतोष कुसाणे,प्रवीण घागवे,शिवाजीराव मंडोळकर, नामदेव पिसे, विलास चौगुले, युवराज पाटील, विनायक कोकितकर,अजित जाधव, राहुल कुरणे, बाळू गुरव, नागराज सावंत, दौलत जाधव,मोहन जुई, परशुराम पाटील, संदीप पाटील, प्रमिला पाटील,रेखा चौगुले,सुलोचना शिनोळकर, इशा निलजकर,विद्या पाटील,रीना केसरकर, पुजा किनिकर तसेच सर्व तालुका प्रमुख विभाग प्रमुख व इतर शिवभक्त, महिला वर्ग तसेचबालचमु मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!