बेळगाव : डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य खात्याकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील अनगोळ परिसरात जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून भेट देऊन पाहणी करण्यात आली. काही भागात स्वच्छता नसल्याचे निदर्शनास आल्याने लवकरच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा. तसेच पाणी गरम करून प्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनगोळ परिसरात भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, अनगोळमधील काही भागात अस्वच्छता निदर्शनास आली आहे. यावरून मनपा आयुक्तांची बैठक घेऊन लवकरच स्वच्छतेबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले