बेळगाव : महानगरपालिकेला १०० कोटी रुपये विकासकामासाठी आले होते. या कामाचे टेंडर हायग्रिव्हा या कंपनीला देण्यात आले होते. २००८ साली टेंडर देण्यात आल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र त्यानंतर महानगरपालिकेकडून आम्हाला ३२ कोटी रुपये बाकी आहे म्हणून हायग्ग्रिव्हा कंपनीने मनपावर खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी ट्रिब्युनलकडे बुधवारी होती. मात्र ती पुढे ढकलली असून १६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. महानगरपालिकेने २००८ साली आम्हाला काम दिले. मात्र प्रत्यक्षात २००९ आणि २०१० सालापासून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे सर्व साहित्याचे दर वाढले होते. त्यामधील तफावत रक्कम आम्हाला महानगरपालिकेने दिली पाहिजे म्हणून हायग्रिव्हा कंपनीने महानगरपालिकेवर ३२ कोटी रुपयांचा दावा केला आहे. या खटल्यामध्ये महानगरपालिकेच्यावतीने कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी सर्व कागदपत्रे दाखल केली असून त्याची सुनावणी आता १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
हायग्रिव्हा कंपनीच्या खटल्याची सुनावणी लांबणीवर
By Akshata Naik
Previous articleतोतया पोलीस अधिकाऱ्याला अटक