No menu items!
Thursday, September 19, 2024

इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग

Must read

बेळगाव – येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दि. 20 ते 26 सप्टेंबर हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून सूरू करण्यात येत आहे.

इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यन्त होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण आहे ? आत्मा काय आहे? पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता? याच बरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते? सर्वोत्तम योग कोणता? आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जात आहे.

या अभ्यासवर्गात प्रवचन, लाईव्ह शो, व्हिडिओ, प्रश्न उत्तर बरोबरच महाप्रसादाचे वितरण केले जानार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी 7264001247
किवा 9035530030 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इस्कॉन च्या वतीने करण्यात आले आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!