चालकाचे नियंत्रण सुटून मालवाहतूक टेंपो रस्त्याशेजारी असलेल्या दगडाला धडकल्याने वाहन चालक जागीच ठार झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील इटनाळ क्रॉसनजीक निपाणी – मुधोळ राज्य महामार्गावर सोमवारी सायंकाळी घडली. गणेशवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील जयपाल नाईक (वय ५०) असे मृत वाहन चालकाचे नाव आहे. वाहनात प्लास्टिक खुर्व्या घालून टेंपो सांगलीहून कबूरकडे जात असताना ही घटना घडली. वाहनातील विजय वास्कर हे गंभीर जखमी झाले असून यांना उपचारासाठी चिकोडी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी चिकोडी डीवायएसपी गोपाल कृष्णगौडर, पोलिस निरीक्षक बसगौडा नेर्ली यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
टेम्पोच्या अपघातात चालक ठार
By Akshata Naik

Previous articleअनगोळच्या तरुणाचा मृतदेह रायबागला आढळला
Next articleइस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग