विष प्राशन करून पडलेल्या तरुणाचा मृतदेह रायबाग येथे आढळला असून सदर तरुण बेळगाव शहरातील अनगोळचा आहे. केतन देवदास धाडवे (वय २५ रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन हा तरुण आयआयटी शिक्षित असून नोकरीसाठी पुणे, मिरज, सांगली येथे फिरत होता. नोकरी मिळत नसल्याने घरात पुण्याला नोकरीसाठी जात असल्याचे सांगून घरातून गेला होता. रेल्वेने पुणेला जात असताना रायबाग येथे उतरून आत्महत्या केल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रायबाग शहराबाहेरील गणगिती माळावर एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. त्यानुसार रायबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर केतन याचा मृतदेह व शेजारी विषाच्या बाटल्या आढळून आल्या. याविषयी घरच्यांना माहिती देऊन सदरमृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी मयत तरुणाची आई सुधा देवदास धाडवे यांनी रायबाग पोलिस स्थानकात फिर्याद केली आहे.
अनगोळच्या तरुणाचा मृतदेह रायबागला आढळला
By Akshata Naik
Previous articleओमान मध्ये कार लॉरी अपघातात गोकाक मधील कुटूंबाचा दुर्दैवी अंत
Next articleटेम्पोच्या अपघातात चालक ठार