गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी पाटील गल्ली शनी मंदिर येथे दुर्घटनेत विजय राजगोळकर ही व्यक्ती जखमी झाली होती त्यांना सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे विजय हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्या उपचारासाठी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे विविध मंडळाने मदत जमा केली होती त्या सर्व रक्कम एकत्र करून 50 हजार रोख रक्कम आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी विजय हॉस्पिटल येथे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर व कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांनी विजय हॉस्पिटल ला भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या हाती स्वाधीन केले.
मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ बेळगाव
अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांच्याकडून 5000 रुपये
बेळगावचा राजा गणेश उत्सव मंडळ चव्हाट गल्ली यांच्याकडून 11000 रुपये
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तहसीलदार गल्ली 5000 रुपये
जतीमठ देवस्थान कडून 10000 रुपये
गणेश उत्सव मंडळ शाहूनगर 10000 रुपये
गणेश उत्सव मंडळ खादरवाडी 5,652
अभिजीत भातकांडे ,पाटील गल्ली बेळगाव 5000
एकूण 51652 रुपये जमा झाली होती त्यातली 50 हजार रोख विजय राजगोळकर यांना दिले व अजून काही मंडळांनी देणगी जाहीर केलेली आहे. त्या सर्व एकत्र करून चव्हाण पाटील हे मृत पावलेले व्यक्तीच्या नाते वकांकडे काही दिवसात सर्व रोक रकमेची मदत गोळा करून देण्यात येणार आहे.
व अजून जवळपास शेकडो मंडळ कार्यरत आहेत त्या सर्व मंडळांना पुन्हा एकदा अध्यक्षांनी आव्हान केला आहे की त्यांनी फुल ना फुलाची पाकळी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे आपले मदतीची रक्कम पोच करावी अशी पुन्हा एकदा विनंती करत आहे.