बेळगावचा सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे हा प्रश्न लवकर सुटत नाही आहे याची कारणे काय आहेत तसेच हा प्रश्न लवकर सुटावा यासाठी फास्टट्रॅक वर हा निर्णय कशाप्रकारे आणता येईल प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बेळगावातील मराठी माणसाची इच्छा ही महाराष्ट्रात येणे आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला हे हिताचे देखील आहे बेळगावातील मराठी माणसाने जे सोसला आहे त्यांना लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच संसदेत देखील या संदर्भात आवाज उठविणार असल्याचे सांगितले.