बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळ येथील एक नेते कॉम्रेड कृष्णामेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता ज्योती महाविद्यालय क्लब रोड बेळगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमातस व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वागतासाठी सीमा भागातील मराठी जनता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री दीपक दळवी, माजी आमदारश्री मनोहर किणेकर , श्री मालोजी अष्टेकर ,श्री प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
कॉम्रेड कृष्णामेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार
By Akshata Naik
Must read
Previous articleबैलहोंगल मध्ये युवकाचा खून :जमिनीच्या वादातून
Next articleसीमा प्रश्ना संदर्भात संसदेत आवाज उठविणार