सालाबादप्रमाणे नंदगड येथे दीपावली क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावर्षी 66 व्या क्रीडामहोत्सवाचे उदघाटन खानापूर तालुक्याचे आमदार श्री.विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी पार पडले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.पि. के.पाटील होते, कै. एम.के.पाटील स्मृती चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेत यावर्षी प्रथमच महिला कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी महिला कबड्डी स्पर्धा पार पडल्या, यामध्ये आजरा संघाने प्रथम क्रमांक तर नंदगडच्या झुंजवाडकर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने पुरुष गटातील कबड्डी सामने पुढे ढकलण्यात आले, पुढील तारीख लवकरच ठरविण्यात येईल असे अयोजकांनी कळविले आहे.
यावेळी व्यासपीठावर सूर्याजी पाटील,के.पि.पाटील,धनंजय पाटील,मल्लाप्पा मारिहाळ,सदानंद पाटील,यल्लाप्पा गुरव,भरमाजी पाटील,लक्ष्मण पाटील,नारायण (पप्पू) पाटील, रणजित पाटील,भरमानी पाटील,सुनीता पाटील,वैष्णवी पाटील,अडली मॅडम व इतर उपस्थित होते.
पंच म्हणून के.व्ही.पाटील,के.आर.पाटील,पी.आर.पाटील,उमेश धबाले अशोक पाटील यांनी काम पाहिले तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू पाटील,नागेंद्र पाटील,किरण पाटील,दिलीप पाटील,के.एम.पाटील आदींनी परिश्रम घेतले.



