देवतांच्या प्रतिमांचा अपमान होऊ
नये याकरिता सर्व लोकसेवा
फाउंडेशनच्या वतीने शहरातील भग्न झालेल्या प्रतिमांचे संकलन करण्यात येते. अशाच प्रकारे अलतगा गावात येथे देखील सर्व लोक सेवा फाउंडेशन च्या वतीने भग्न झालेल्या मूर्ती फोटो आणि कॅलेंडरचे संकलन करण्यात आले. तसेच देवतांचा प्रतिमांचा अपमान करू नये याबाबत सूचना जनजागृती देखील करण्यात आली. यावेळी आदले दिवशी रात्री गावांमध्ये दवंडी द्वारे ग्रामस्थांना याबाबत सूचित करण्यात आले होते त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता अनेक नागरिकांनी देवी-देवतांचे जुने फोटो कॅलेंडर सर्व लोकसेवा फाउंडेशन कडे जमा केले. या कार्यात सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या सदस्यांबरोबरच गावकऱ्यांना देखील हातभार लावला. यावेळी सर्व फोटोंचे आणि मूर्तींचे संकलन करून सर्व लोक सेवा फॉउंडेशन कडे सुपूर्द करण्यात आले