बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागातर्फे शहापूरमधील म.
ए. समिती कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक व मराठी भाषिक यांची बैठक शनिवार दि. २६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर रामलिंगवाडी, शहापूर येथे बोलाविण्यात आली आहे. आगामी १ नोव्हेंबरचा काळा दिन, मूक सायकल फेरी व हरताळ यशस्वी करण्यासाठी तसेच सायकल फेरीत बहुसंख्येने मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे यासाठी ही जनजागृती बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे नेते राजकुमार बोकडे व शिवाजी हावळाण्णाचे यांनी केले आहे