बेळगाव : जिल्हास्तरीय शिक्षण अदालत जिल्हापंचायत सभागृहामध्ये मंगळवार दि. १९ रोजी होणार आहे. शिक्षकांचा वैद्यकीय खर्च, सामान्य भविष्य निर्वाह निधी, थकीत वेतन, पेन्शन, सण-उत्सवांच्या निमित्ताने आगाऊ वेतन आदी बाबींवर शिक्षण अदालतमध्ये चर्चा होणार आहे.
शिक्षकांनी आपल्या काही समस्या असल्यास दि. १५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या कार्यालयात (बेळगाव) अर्जाद्वारे दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे