केंद्रीय जलऊर्जा व रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा गुरुवार दि. १४ रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या भेटीदरम्यान ते बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. याचबरोबर केएलई संस्थेच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विकासकामांचा आढावा घेणार आहेत. दुपारी २ वा. केएलई संस्थेच्या १०८ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर काही खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून रात्री ८ वा. सांबरा विमानतळावरून बेंगळूरला रवाना होणार आहेत
उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत हे करणार चर्चा
By Akshata Naik
Previous articleजिल्हास्तरीय जम्प रोप (दोरी उडी) मारण्याच्या स्पर्धा
Next article१९ रोजी शिक्षण अदालत, शिक्षकांना आवाहन