कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्तेवर येण्याआधी पाच हमी योजना दिल्या होत्या.त्यातील घरगुती विज शुन्य बील म्हणून घोषणा केली होती.ती आता हवेत विरुन जनतेला भरमसाठ बीलं येऊ लागली आहेत.आधीची मिटर होती तेंव्हा अगदी माफक बीलं यायची पण आता आधी होता त्याहीपेक्षा कमी वापर.कारण घरात एल.ई.डी. बल्ब,नळाला पाणी जोर नसतो म्हणून रोज एकच तास पाव एच.पी.मोटर,टिवीतर कधी चालू कधी बंद त्यात कौलारु घर म्हणजे जास्त लाईटचा वापरच नसतो.पण नवीन मीटर लागल्यापासून अलिकडे भरमसाठ बीलं येत असल्याने सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने जनतेला दिलेली आश्वासनं फोल ठरताहेत कि विद्यूत खाते जनतेवर बेकायदेशीर बीलं लादताहेत हे समजेनासें झालय.तेंव्हा सरकारने यावर गांभीर्याने लक्ष घालून जनतेची लूट थांबवावी अन्यथा बेळगावमधील येत्या अधिवेशनात याचे पडसाद उमटल्याशिवाय रहाणार नाहीत असा इशारा नागरिकांनी दिलाय