बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माण गावामध्ये शेतात काम करत असताना जोडप्यावर दोन अस्वलांनी अचानक हल्ला केला .या हल्ल्यात 63 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा पायाचा अस्वलने चावा घेतला असल्याने त्यांचा पाय मोडला/तुटला आहे.
सकुराम महादेव गावकर हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांची पत्नी अस्वलाच्या हल्ल्यात बालबाल बचावली आहे. गुरांना चारा आणताना शेतात काम करत असताना अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला सध्या जखमीवर बेळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.