बेळगाव – बेळगाव येथील पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी बेळगाव शहरात भव्य पत्रकार भवन उभारण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चालविली होती.त्या मागणीला यश आले आहे. उद्या शुक्रवारी दुपारी २.३० वाजता विश्वेश्वरय्या नगर येथे पत्रकार भवनाचा पायाभरणी समारंभ संपन्न होत आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पत्रकार भवन पायाभरणी होणार आहे.
बेळगाव शहरातील पत्रकारांनी बेळगाव शहरात भव्य पत्रकार भवन बांधण्यात यावे ही मागणी सातत्याने लावून धरली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी बेळगावच्या पत्रकारांनी या मागणीचा पाठपुरावा विद्यमान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे केला होता. मोहम्मद रोशन यांनीही पत्रकारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विश्वेश्वरय्या नगर येथील जागा पत्रकार भावनाला उपलब्ध करून दिली. त्यामुळेच पत्रकारांच्या मागणीला यश आले आहे.
उद्या शुक्रवारी सकाळी जिल्हा प्रशासन, बेळगाव महानगरपालिका, माहिती प्रसारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने,विश्वेश्वरया नगर येथे पत्रकार भवन पायाभरणीचा समारंभ होत आहे. पायाभरणी समारंभाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह महिला बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ,आमदार अशोक पट्टण, खासदार ईराण्णा कडाडी, खासदार प्रियंका जारकीहोळी,खासदार जगदीश शेट्टर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.