बेळगाव : घरचा दरवाजा आतूनबंद करून घेऊन झोपी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवार दि. १३ रोजी टिळकवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अंबरीशकुमार रमेशचंद श्रीवास्तव (वय ५३, मूळचे रा. हरियाणा, सध्या रा. भाग्यनगर, दहावा क्रॉस) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी स्नेहा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अंबरीशकुमार हे आयटी इंजिनिअर असून बुधवार दि. ११ रोजी सायंकाळी ५.१० ते गुरुवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ या दरम्यान ते घरचा दरवाजा आतून बंद करून घेऊन बेडरुममध्ये झोपी गेले होते. मात्र त्याच ठिकाणी त्यांचा हृदयाघाताने किंवा अन्य कोणत्या तरी आजाराने मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.