मातोश्री अहिल्याबाई होळकर यांच्या त्रि शताब्दी जन्म महोत्सव, उन्नती ट्रस्ट, राष्ट्र सेविका समिती आणि सामजिक समरसता मंच, बेळगावी यांच्या संयुक्त आश्रय मधे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला, मुख्य पाहुणे संशोधक, लेखक श्री शंकर बुचडी, उपस्थित होते.
मुख्य वक्त्या म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय प्रचार व प्रसार प्रमुख, श्रीमती सूनीला सोवणी, पुणे ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रम, देवी अहिल्याबाई यांचे आराध्या दैवत शिवलिंगचे बिल्व अर्चन करुन व भारत मातेचे पूजन करुन झाले.
कार्यक्रमाला उद्देशून श्रीमती सूनिला सोवणी यानी, देवी अहि्याबाई यांच्या जीवकार्याचा आढावा घेत, एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्या, माहेश्वरी राजघराण्यात सून म्हणून गेल्या, अत्यंत कष्ट सोसून, माळवा राज्याच्या कारभार सुव्यवस्थित पने सांभाळत, त्यांचे समाज कार्य, मोगलांनी पाडलेल्या अनेक मंदिरांचे, काशी विश्वनाथ सोमनाथ मंदिर, बारा ज्योतिर्लिंग सहित 900 हून अधिक मंदिरांचे जीर्णोद्धार कार्य, या बरोबर पर्यावरण व स्त्री सबलीकरण चे कार्य पण, त्यांनी केले आहे, हे सांगताना, माहेश्र्वरी साडी चे उत्पादन व त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्याचा पण उल्लेख केला. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देणारे कायदे, अमलात आणले. सैनिकांच्या विधवा यांना आधार, भिल्ल समाजाचे पुनर्वसन, भूमिहीनांना भूमी कसायला देवून, 9/11 प्रमाणे भागीदारी देण्याचे कार्य, असे अनेक क्रांतिकारक कायदे त्यांनी 300 वर्षा पूर्वीच अमलात आणले होते.
पुढे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री शंकर बुचडी यानी आपल्या भाषणात म्हणाले की, 300 वर्षा पूर्वी, स्त्री अबला नाही सबला म्हणून सिद्ध केले होते. महिलांचे हक्क, सामजिक न्याय, सनातन धर्माचे रक्षण या बरोबरच 300 वर्षा पूर्वी, हातमागावर बनवलेले माहेश्र्वारी साड्या आज सुद्धा उपलब्ध आहेत असे उल्लेख करत, ह्या अश्या महान देवीच्या स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमात सहभागी होता आले, या बदल त्यांनी आनंद व्यक्त केला.
अखिल भारतीय सह कार्यावहिका, श्रीमती अलका इनामदार, यांच्या प्रास्ताविक भाषणात, त्यांनी उन्नती ट्रस्ट, राष्ट्र सेविका समिती व सामजिक समरसता मंच च्या कार्याची माहिती दिली, या बरोबर हा कार्यक्रम आयोजित करण्या मागचा उद्देश याचे महत्त्व सांगितले.
कुमारी सृष्टी व कुमारी पूर्वी, यांच्या सुमधुर गीताने कारयक्रमाची सुरुवात झाली.
याच कार्यक्रमात
दोन गण्य व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
एक, बेळगावचे मान्य महापौर श्रीमती सविता कांबळे, आणि अनेक भजनी मंडळी चे गुरुजी,
श्री शंकर पाटील.
कुमारी उज्वला बडवाणाचे यानी सत्कार मूर्तींचा सुयोग्य परिचय करून दिला.
श्री श्रीशैल मठपती यानी मंचावर उपस्थित गण्यमण्य चे स्वागत व परिचय करून दिले.
मंचावर, उन्नती ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रमती लक्ष्मी मिर्जी, रा. से. समितीच्या अखिल भारतीय सह कर्यावहिका श्रीमती अलका इनामदार, सामजिक समरसता मंच चे नगर संयोजक श्री नंदिश कोरी, उपस्थित होते.
श्रीमती लक्ष्मी मीर्जी यानी आभार मानले,
आणि श्रीमती पूर्णिमा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदर सूत्र संचालन केले.
शेवटी, स्थानीय कलाकारांनी बसवलेले देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर एक सुंदर लघु नाटक सादर करण्यात आले.