राज्यात खासगी पदवीपूर्व(पीयू) महाविद्यालये सुरू करू इच्छिणाऱ्या पात्र संस्थांकडून सोमवार दि. ३० पासून ऑनलाईनद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. कर्नाटक शाळा शिक्षण खात्याकडे (पदवीपूर्व विभाग) २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये अर्ज दाखल केलेल्या संस्थांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे पदवीपूर्व विभाग शिक्षण खाते उपसंचालिका सिंधू रुपेश यांनी कळविले आहे