सौंदत्ती रेणुकादेवी (यल्लम्मादेवी) डोंगरावर दि. ९ ते १९ जानेवारीपर्यंत होणाऱ्या यात्रेनिमित्त बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक व शहर बसस्थानकावरून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अगाऊ तिकिटाची सोयही असून मध्यवर्ती बसस्थानकावर बुकिंग काऊंटरची व्यवस्थाही आहे. बेळगाव-१ मध्ये संपूर्ण बससाठी आरक्षणाची व्यवस्था केली आहे.
माहितीसाठीअधिक ७७६०९९१६१३ किंवा ७७६०९९१६२५ वर संपर्क साधावा, असे आवाहन वायव्य कर्नाटक परिवहन संस्थेच्या विभागीय नियंत्रकांनी केले आहे