बेळगाव येथील सदाशिवनगर मधील रहिवासी डॉ. हर्षा अष्टेकर यांना मंगळूर निट्टे विद्यापीठाकडून फार्माकोलॉजी विषयामध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘पर्किन्सन रोगाच्या उपचारात पायराझोलोन. डेरिव्हेटिव्जचे डिझाईन डेव्हलपमेंट’ हा प्रबंध सादर केला. त्यांना पीएचडीसाठी डॉ. निम्मी वर्गीस यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. हर्षा यांनी पर्किन्सन रोगावरील उपचारासाठी पायराझोलोन रेणूंवर पेटंटसाठी अर्ज केला आहे. या संशोधनासाठी निट्टे विद्यापीठाकडून त्यांना चार लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे