बेळगाव : राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ शरीरसौष्ठव स्पर्धा बेळगाव येथे 14 15 व 16 जानेवारी रोजी होणार आहे. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांना स्पर्धेच्या आयोजन समितीचे सह-अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. या स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यापूर्वीच संमती दर्शवली आहे. पोलीस आयुक्त मार्टिन यांनी सदर बाबांचा तुझा अभिमान असून सहअध्यक्षपदाला संमती दर्शवून स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही दिली. यावेळी केएबीबीचे अध्यक्ष अजित सिद्दण्णावर. मिस्टर इंडिया रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी गंगाधर, हेमंत हावळ, सुनील पवार, विकास कलघटगी, प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेचेपोलिस आयुक्तांना आमंत्रण
By Akshata Naik

Previous articleडॉ. हर्षा अष्टेकर यांना पीएचडी
Next articleतालुका एम. ए. समिती- युवा आघाडीची उद्या बैठक