सलग दोन दिवस चालणारी एकांकिका स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे आजपासून सुरू होणार आहे. सलग 13व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन कॅपिटल वन ही संस्था करीत आहे.
बेळगाव शहराला लाभलेली नाट्यपरंपरेला गत वैभव प्राप्त करून देण्याच कार्य संस्था करत आहे.
पारदर्शकता व निटनेटक्या आयोजनाचा जोरावर सदर स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून कॅपिटल वन करंडक हा नाट्यक्षेत्रात मानाचा करंडक मानला जात आहे.
अंतिम निर्णयाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक वर्षी दिग्गज व नाट्यक्षेत्रातील विद्वान परीक्षकांना पाचारण करण्यात येत असते.यंदाही राविदर्शन कुलकर्णी,केदार सामंत व यशोधन गडकरी या सन्मानीय परीक्षकांना निमंत्रित करण्यात आले आहे.परीक्षकांचा अल्प परीचय खालील प्रमाणे
रवी दर्शन कुलकर्णी कोल्हापूर
कोल्हापूर येथील नाट्य कलाकार महापौर, झुलताफुल, राईट युवर, भूमितीचा फार्स या नाटक एकांकिका मधून यांनी अभिनय केला आहे. छळ छावणी, यशोधरा, तुगलक, द केअर टेकर, सारी रात्र,पाणी, तुका म्हणे अवघे सोंग, या नाटक एकांकिकेचे दिग्दर्शन केले आहे. तुगलक, सारी रात्र या नाटकांना राज्य शासन पुरस्कार मिळाले आहेत. संगीत व नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तथास्तु फोरम कोल्हापूर, अभिरुची परिवर्तन, कला फाउंडेशन, जाणीव चारिटेबल फाउंडेशन या संस्थांशी ते संबंधित आहेत. नाटककार आळेकर यांच्या भजन, महापौर, मिकी आणि मेमसाहेब या तीन संहितांमधून एकसूत्र घेऊन एक तासाचे नाविन्य पूर्ण सादरीकरण त्यांनी केले आहे. अनेक विविध गावांमधून ते राज्यस्तरीय एकांकिकांचे ते परीक्षक असतात तसेच वर्तमानपत्रातून समीक्षणही लिहितात.
केदार सामंत -कुडाळ
कुडाळ येथील नाट्य कलाकार पडधम, तीन पैशाचा तमाशा, अशी पाखरे येती, जास्वंदी, संगीत लग्नकल्लोळ, सारे प्रवासी घडीचे, दुभंग, लोककथा-७८, काळंबेट लालबती अशा गाजलेल्या नाटकामधून यांनी भूमिका वटवल्या आहेत. यापैकी बऱ्याच नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले आहे. भिंत, कळकीच बाळ, धोबीपछाड, मेल्या आईचा चहा, ठराव अशा अनेक एकांकिका मध्ये भूमिका करून अनेक एकाकिकांचे दिग्दर्शनही केले आहे. अनेक बाल नाट्यामध्ये मध्ये भूमिका करून बालनाट्यांचे दिग्दर्शन हि केले आहे. “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” या सण मराठी मालिकेत त्यांनी भूमिका वटवली आहे. मुक्काम पोस्ट भोकरवाडी या नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे. लोकप्रिय अशा बाबावर्धन थिएटर्सचे ते कार्यवाह आहेत. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, व्यवस्थापक, संयोजक, बालनाट्य प्रशिक्षक अशा अनेक क्षेत्रात ते प्रवीण आहेत. आरती प्रभू कला अकादमीचे ते सहकार्यवाह आहेत.
यशोधन अनिल गडकरी -सांगली
सांगली येथील नाट्यकलाकार रक्त नको मज प्रेम हवे, सदू आणि दादू, झाडाझडती, सरहद्द, नारा मंडल, आम्ही सारेच घोडेगावकर, सं.मंदारमाला इत्यादी नाटक एकांकिकातून अभिनय केला आहे. उजेड फुला, भर चौकात गांधी पुतळ्यासमोर, धर्ममाया, भाकड, काळोख देत हुंकार, सलवाझुडूम, वृंदावन, अजूनही चांदरात आहे या नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. गिफ्ट, देव बाभळी, विवर इत्यादी एकांकिकांना बक्षीसे प्राप्त झाली आहेत. झाडाझडती सर्वोत्कृष्ट अभिनेता नाट्य कला मंदिर प्रथम पुरस्कार, फ्रेंडशिप, वृंदावनला रौप्य पदक तसेच अनेक एकांकिकांना पारितोषिके. राजनाट्य स्पर्धेत अनेक नाटकांना दिग्दर्शन पुरस्कार भगवती क्रिएशन्स, आठ फिल्मचे दिग्दर्शन, फिल्म फेस्टिवल मधून पुरस्कार, शॉर्ट फिल्म, नाट्य शिबिरे असे विविध धांगी व्यक्तिमत्व….
चषकाचे अनावरण
शनिवार दि.4 रोजी चषकाचे अनावरण सायं 5 वाजता विविध मान्यवरणच्या उपस्तीतीत होणार आहे
प्रवेश संपूर्णतः मोफत असून केवळ सादरीकरनादरम्यान नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही.
अतिशय रंजक वळणावर आलेल्या या स्पर्धा नवोदित कलाकारांना रंगभूमी तर नाट्य रसिकांसाठी पर्वणी ठरतील
यात शंका नाही.
बेळगावकर नाट्यप्रेमीनी नेहमीप्रमाणेच स्पर्धेस उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेतर्फे चेअरमन शिवाजी हंडे यांनी केले आहे.