No menu items!
Sunday, February 23, 2025

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Must read

बेळगांव: शहरातील आंबेडकर उद्यान येथे भारत देशातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती विविध दलीत संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी डॉ विद्याश्री गिर्यप्पा कोलकर (हलगा बस्तावड ) सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच आज समाजामध्ये स्त्रीला मानसन्मान मिळाला आहे. प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाई फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे ६ वर्षाची चिमुकली साक्षी दरेंनावर हे सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर विविध दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

त्यानंतर रेवेन्यू बँकच्या पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या बसवराज रायवगोळ यांचा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मंत्री सतीश जारकिहोळी,बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगले, रेव्हेन्यू बँक अध्यक्ष बसवराज रायवगोळ, जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी प्रदीप एम जे, दलीत नेते मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, महादेव तलवार, सुधीर चौगुले, शिवपुत्र मैत्री, जीवन कुरणे, सुभाष कांबळे, गिर्यप्पा कोलकर,दीपक केतकर,
संतोष हलगेकर,आकाश हलगेकर,सिद्दराय मैत्री, संतोष गुबची, सुनील देशनुर, प्रमोद मैत्री, सागर मुद्दिंमनी, मनोज, चेतन दोडमनी , अक्षय कोलकर, रवी बस्तवाडकर उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!