कोरोना व्हायरस प्रमाणे चीनमध्ये आता पुन्हा एकदा ह्यूमन मेकॅनिसो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही हा मोठ्या प्रमाणात पसरत आहे हा व्हायरस भारतात पसरण्याची शक्यता असतानाच आता बेंगलोर मध्ये याचा पहिला रुग्ण आढळला आहे. आठ महिन्याच्या बालकाला एच एम पी व्ही ची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. बेंगलोरच्या खाजगी रुग्णालयात यासंबंधी चाचणी करण्यात आली होती यामध्ये आठ वर्षाच्या बालकाला या व्हायरसची लागण झाली आहे.
सरकारी रुग्णालयांना या संदर्भात अजूनही कोणतीही टेस्ट केली नाही असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे .मात्र खाजगी रुग्णालय आठ महिन्याचे बालकाला लागण असल्याची माहिती समोर आली आहे .चीनमध्ये या व्हायरसमुळे अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे. या व्हायरस चा पहिला रुग्ण हा बेंगलोर मध्ये आढळल्या असल्याने मोठी चिंता वाढली आहे.
बेंगलोर मध्ये 8 महिन्याच्या बालकाला एच एम पी व्ही ची लागण
