No menu items!
Sunday, February 23, 2025

युवा मेळाव्याला उपस्थित राहून सीमालढ्याला बळकटी द्या—-शिवाजी हावळणाचे

Must read

महाराष्ट्र एकीकरण तालुका युवा आघाडी तर्फे आयोजित युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवकांनी सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शिवाजी हावळणाचे यांनी केले,

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२जानेवारी रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन शहापूर महात्मा फुले रोड येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे केले आहे,याबाबत जनजागृती करण्यासाठी शहापूर येथे संत सेना भवन गाडे मार्ग येथे बैठकीचे घेण्यात आली.

या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे व सीमा लढ्याला बळकटी द्यावी, तसेच येत्या 17 जानेवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्रकीकरण समितीने हुतात्मा दिनी बेळगाव व सीमाभागात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर “चलो कोल्हापूर” चा नारा दिलेला आहे, तेथील आंदोलनाही बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले,

कार्याध्यक्ष व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आगामी काळात युवा समिती सीमाभागाच्या वतीने सीमा भागातील युवकांच्या भेटी गाठी घेऊन युवकांना Helping करण्यात येणार असून युवकांना जास्तीत जास्त लढ्यात सहभागी कसे करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे असे सांगितले.

शहापूर येथील समिती कार्यकर्ते अशोक घागवे,राजू पाटील,सुरज जाधव व रणजित हावळणाचे यांनी आपली मते व्यक्त करून युवा मेळाव्याला पाठींबा दर्शवून बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले तसेच हुतात्म्या दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन केले.
चिटणीस सचिन दळवी यांनी आभार मानले,

या बैठकीला भागोजी पाटील,विनय पाटील, ज्ञानेश चिकुर्डे, गौरव बाबली, ओंकार बैलूरकर, विनय मेलगे, अरुण पाटील, उमेश पाटील,विनायक मजुकर विश्वनाथ येळ्ळूरकर, अमित पाटील, संदीप कांबळे, सुकेश कुगजी, विशाल सावंत, गणेश माळवी, परिणय कदम,अनिल घडशी, मारुती कांबळे, शुभम जाधव, ज्ञानेश बाडीवाले,अमर डवरी,अभिषेक बिरजे, प्रणव माळवी,ओम बेलूरकर, शुभम सारंग, प्रमोद पाटील, अमित पाटील,शरद कडू, महेश भातखंडे, मोहन पोटे,रोहित पाटील, रोशन पाटील, आनंद बाचीकर, प्रतीक माळवी आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!