राज्यातील 11 डीएसपी 41
सीपीआय व ८८ पीएसआय या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री गृहखात्याने बदल्यांचा आदेश जाहीर केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या वाहतूक विभागाच्या एसीपी पदावर जोतिबा निकम यांची नियुक्ती झाली आहे. तर खानापूरच्या सीपीआयपदी लालेसाब हैदरसाब गौंडी यांची नियुक्ती झाली आहे. तर लोकायुक्त विभागाचे अजिज कलादगी यांची खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे