बेळगाव मधील प्रसिध्द शिक्षण संस्था मराठा मंडळ चव्हाट गल्ली व साई स्पोर्ट्स तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नवीन स्केटिंग रिंक व क्रिकेट आणि फुटबॉल टर्फ ग्राउंड चे उद्घघाटन करण्यात आले.मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गर्शनाखाली समाजातील गोर गरीब व होतकरू व इतर सर्वांना या खेळांचा उपयोग व्हावा म्हणून या सर्व ग्राउंडची निर्मिती कऱण्यात आली आहे.या ग्राउंड चे उद्घघाटन मराठा मंडळ चे उपाअध्यक्ष श्री राजेश हलगेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी सर्व खेळाडूना मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यानी खेळामध्ये सहभाग घेऊन फिट राहून उत्तम आरोग्यसाठी आणि आपले भविष्य उज्वल करण्यासाठीं शुभेच्छा दिल्या यावेळी धनश्री हलगेकर, सुधीर हलगेकर, संयोगिता हलगेकर जयंत जाधव,संदीप जाधव,राम घोरपडे, अशोक गोरे,साई स्पोर्ट्स चे संचालक प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, सुर्यकांत हिंडलगेकर,आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी स्केटिंग, क्रिकेट व फुटबॉल चे प्रशिक्षक योगेश कुलकर्णी,विशाल वेसने, विनय नाईक,संजय ढवळे,तेजस पवार सागर चौगुले, ऋषीकेश पसारे,या सर्वाचा पुष्गुच्छ देवून गौरविण्यात आले यावेळी बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स,पालक व मराठा मंडळ व साई स्पोर्ट्स चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते
मराठा मंडळ च्या नवीन स्पोर्ट्स ट्रॅक चे उद्घघाटन साई स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
By Akshata Naik
Must read
Previous articleमकरसंक्रात निमित्त जोतिबा देवाला तिळगुळाचे दागिने अर्पण
Next articleरंगूबाई पॅलेस मध्ये आज समितीची बैठक