लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे महिला विद्यालय इंग्रजी माध्यमं शाळेचा के. जी. डे म्हणजे मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठीचे अवचित्य साधून मुलांचे मुक्त व्यासपीठ म्हणजे के. जी डे म्हणुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती संजय कुलकर्णी, या उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या चेअरपर्सन, डॉ. शोभा शानभाग ,सेक्रेटरी श्रीयुत विवेक ग. कुलकर्णी उपस्थित होते.
तसेच शाळेच्या सहशिक्षिका जया यळगुकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले. व प्रमुख पाहुण्यांनी सोशल मिडिया पासून मुलांना दूर ठेवून खेळ, गाणी, नृत्य या सारख्या कलांची आवड लावा. असा पालकांना संदेश दिला. सिनियर केजीची विद्यार्थीनी श्राव्या चौगुले हिने आभार मानले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कविता परमाणिक व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला