बेळगुंदी येथील बालवीर सोशल फौंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलात हवालदार पदी असलेले ढेकोळी गावचे जवान मा. श्री. वैजनाथ जानबा शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी शाळेचे संयोजक मा. श्री शंकर चौगुले सर व बालवीर महिला अर्बनच्या अध्यक्षा रिता बेळगावकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रमुख अतिथी व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली.निवृत्त मुख्याध्यापक अर्जुन चौगुले सर तसेच प्रमुख अतिथी वैजनाथ शिंदे सर ,̤ कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर चौगुले सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व्यासपीठावर बालवीर अर्बनचे अध्यक्ष आनंदा जाधव ,उपाध्यक्ष राजू मुजावर ,संचालक सुभाष हदगल, परशराम झंगरूचे दशरथ पाऊसकर, माझी ए पी एम सी अध्यक्ष अप्पा जाधव तसेच बालवीर महिला सोसायटीच्या अध्यक्षा रिता बेळगावकर, बिस्मिल्ला तहसीलदार वनिता गवंडी , रामाक्का पाटील, कुसुम चौगुले, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील ,सुनील जाधव सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला माजी दहावी बॅचच्या विद्यार्थिनी, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा पटवर्धन यांनी केले तर अतिथींचे स्वागत व ओळख प्रकाश मेटकर यांनी करून दिले व आभार पूजा पाटील यांनी मानले.
बालवीर विद्यानिकेतनमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
By Akshata Naik
Previous articleमहाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा
Next articleबेळगाव बुडा आयुक्तपदी डॉ. रुद्रेश घाळी



